लवंग
भारतीय आहारात तसेच वनौशधींमधे मानाचे स्थान असणारे लवंग आपणा सर्वांनाच परिचित आहे. आता भारतातच नाही तर परदेशातही भरपूर मागणी असणारे लवंग अनेक शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पन्न स्त्रोत बनले आहे.
फक्त लवंग खाल्ले तर तिखट चव येते, पण योग्य प्रमाणात जेवणात घातले कि जेवणाला येणारा स्वाद काही वेगळाच असतो.
बारा ते सतरा मीटर उंच वाढणारे लवंगाचे झाड, सदाहरित वृक्ष प्रकारात येते. काही मोजके कीटक सोडले तर तसा लवंगाचा नैसर्गिक शत्रू नाही. बहुदा याच कारणासाठी लवंगाने स्वतःमधे तिखटपणा आणलेला असावा.
लवंग काढतात कशी?
दक्षिण भारतात लवंगाची शेती होते. त्यातही कन्याकुमारीमधे होणाऱ्या लवंगाला ‘दर्जेदार लवंग’ म्हणून जागतिक महत्त्व मिळाले आहे. शिवाय ते तितकेच महागही आहेत. निळसर-तांबड्या रंगाचे, गुच्छ स्वरुपात येणारे फुल म्हणजेच लवंग. फुल पिवळसर ते फिकट पोपटी रंगाचे असतानाच झाडावरून काढले जाते. यानंतर ते कापडावर पसरवून उन्हात वाळवले जाते. लवंगाचे तेल हे त्याच्या डोक्याकडील गोलाकार भागात जास्त असते, म्हणून फुल काढताना योग्य काळजी घेतली जाते. भारतात लवंगाचे महत्त्व आहेच, परंतु जागतिक बाजारातही उत्तम मागणी असल्याकारणाने, सुनियोजित पद्धतीने लवंग वाढविले जाते.
लवंगाचे औषधी महत्त्व
उष्ण प्रव्रीत्तीचे असलेले लवंग आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे मानवी जीवनात अतिशय लाभदायक आहे. दातदुखी, यकृत सूज, हाडांचे आरोग्य या आणि अशा अनेक समस्यांवर उपायकारक आहे. रक्तदाबात महत्त्वाचा भाग असतो तो मँगॅनीजचा. मँगॅनीज कमी झाल्यास धमनीकाठिण्य होऊ शकते, यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो तसेच रक्तदाबही वाढू शकतो. अशातच लवंगाचे तज्ञांच्या सल्ल्याने सेवन करणे लाभदायक ठरू शकते.
कर्करोग, अल्सर अशा आजारांमधेही लवंग गुणकारी ठरत आहे.
जसे लवंग लाभदायक तसेच ते हनिकारकही ठरू शकते. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय अतिसेवन झाल्यास उपायापेक्षा अपाय होऊ शकतो. म्हणूनच योग्य काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
भारतीय अन्नातील महत्त्वाचा भाग असलेल्या लवंगाची माहिती वाचून कसे वाटले हे नक्की कळवावे हि विनंती.
आणखी माहितीसाठी येथे विकिपीडिया लिंक जोडत आहे. तसेच, ब्लॉग पेजकडे परत जाण्यासाठी येथे क्लिक करा.