प्रतिभा केटरर्सची लज्जत....
नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम प्रतिभा केटरर्सचे आम्ही मिराशी कुटुंबीय, आपले स्वागत करीत आहोत. आम्हाला आपल्याला कळवायला आनंद होत आहे कि, आता lajjat.in या वेबसाईटद्वारे आम्ही आपल्यासोबत ऑनलाईन माध्यमातूनही जोडले जात आहोत.
सध्या विक्रीसाठी कोणते पदार्थ आहेत ? सिझनल किंवा सणांचे पदार्थ कोणते आहेत ? त्यांच्या किमती काय आहेत ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे थेट वेबसाईटवर उपलब्ध असतील. ऑर्डर छोटी असो वा मोठी, सदर वेबसाईटचा आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे.
काही नेहमी मागवले जाणारे पदार्थ....

उकडीचे मोदक
प्रामुख्याने गणेश जन्मोत्सव कालावधीत बाप्पाला व तुम्हा-आम्हा सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. सुवासिक तांदळाची पिठी वाफवून त्याच्या पाऱ्या ( गोल वाटी सारखा आकार) करून त्यात गूळ, वेलची पावडर व ओल्या नारळाचे मिश्रण भरून तयार होणारा मोदक व त्याला छानशी वाफ देऊन त्यावर साजूक तुपाची धार या सर्व कलपनेनेच तोंडाला पाणी सुटते. महिन्यातून एकदा तरी उकडीचे मोदक खाणे आरोग्यास चांगले. का? सांगतो.
मोदकात गूळ, नारळ, तांदूळ हे प्रमुख घटक असतात. लोहाचा (Iron) उत्तम स्त्रोत म्हणजे गूळ, कर्बोदकांचा साठा म्हणजे तांदूळ आणि नारळातून मिळणारी अनेक खनिजे नव्याने सांगायला नकोत ना! थोडक्यात, उकडीच्या मोदकांच्या सेवनामुळे शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि खनिजांचा पुरवठा होतो.
तेव्हा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तयार केलेले उकडीचे मोदक, ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना चव, आनंद तसेच समाधान मिळवून देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
आम्ही वर्षभर उकडीच्या मोदकांची ऑर्डर घेतो.
पुरणपोळी
महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे पुरणपोळी. कोणत्याही मराठी सणावाराच्या वेळी महाराष्ट्रीय घरात गोडाधोडाचा बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला असतो, तितका तो करायला कठीण असतो. पुरणपोळीत आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे मांडा. हा खापरावर बनवला जातो.
पुरणपोळीबरोबर तूप घातलेली गुळवणी म्हणजे खवय्यांसाठी एक मेजवानीच असते. तसेच पुरणपोळी म्हटली की कटाची आमटी हे समीकरण विसरून कसे चालेल. चिंच, गूळ, भाजलेले सुके खोबरे, व इतर मसाले वापरून तयार होणाऱ्या आमटीचा आस्वाद घेणे म्हणजे अमृतयोग.


इडली चटणी (सांबार)
प्रत्येक भारतीय घराघरात इडली, डोसा, गरमगरम चविष्ट सांबार हे पदार्थ आठवड्यातून एकदा तरी होतातच. जशी प्रत्येक पदार्थाला त्याची जोडी ठरलेली आहे तशीच इडली – सांबार ची जोडी. मुळात भारताच्या दक्षिणेत मुख्य अन्न असलेले सांबार आज जगभरात बनवले जाते आणि खाल्ले जाते. मात्र प्रत्येक प्रांतात आणि घराघरात बनविण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.