अभिप्राय
पूर्वी ज्याप्रमाणे अभिप्राय वहीत लिहिले जायचे तसे ते आजच्या ऑनलाईन जगात गुगल रिव्ह्यू , फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या माध्यमांतून लिहिले जातात. आम्हाला काही ग्राहकांचे मिळालेले प्रेम, स्नेह अपल्यापुढे सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि, अमच्या कामाबद्दल ग्राहकांना काय वाटते, याची कल्पना सदर स्नेह पाहून अपल्याला येईल.
केवळ ग्राहक मिळविणे इतकाच उद्देश बाळगून काम केल्यास त्या कामाचे मोल केले जात नाही, प्रेमाने, काटेकोर स्वच्छता आणि निर्मळ भावाने पदार्थ बनविले गेले कि त्याची पावती मिळणार हे निश्चित. अशा भावाने काम करणे हि आम्हा मिराशी कुटुंबियांची अंगवळणी पडलेली सवय आम्हाला उत्तम पदार्थ बनविण्यात मदत करते.
पुढे व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे आलेले मेसेजेसचे स्क्रीन शॉट्स शेअर करीत आहे. आशा करतो कि लवकरच आपणही या लज्जत परिवाराचे सदस्य व्हाल आणि आम्हाला अपली सेवा करण्याची संधी द्याल.