आमचे काम आपल्यापुढे सादर करताना आम्ही उत्साहित आणि आशावादी आहोत. आपण लज्जतचा मन तृप्त करणारा अनुभव घेतला असेल तर उत्तमच, परंतु प्रथमच आम्हाला सेवेची संधी देणार असाल तर सदर पेज आपल्यासाठी मनापासून सादर.
कोणत्याही मंगल कार्यात उत्तम केटरिंग असले कि, कार्यक्रम अनेक पाहुणे मंडळींच्या लक्षात राहतो. हि केटरिंगची ताकद ओळखून आणि पारखून, अनेक वर्षांचा अनुभव सोबत घेऊन दर्जेदार पदार्थांसाहित आम्ही आपल्या सेवेत हजर आहोत. अगदी छोटा घरगुती कार्यक्रम असो वा लग्न, मुंज असे सोहळे असो, आम्ही आमची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडतो. अहो, अन्न तयार होत असतानाच पाहुण्यांच्या जिभेवर चव रेंगाळणे हि तर आमची खासियत.
आम्ही आशा करतो कि आमचे काम, अर्थातच, झालेले काम आपल्याला आवडेल आणि आपण आम्हाला आपल्या सेवेची संधी द्याल. आम्ही आपल्या पाहुण्यांचे मन तृप्त करू अशी आम्हाला खात्री आहे.
साजूक तुपासोबत मोदकांचा स्वाद….
खमंग सुरळीची वडी
बालगोपाळांपासून थोरांपर्यंत, रगडा पुरी, पाणी पुरी हे अगदी आवडीचे बेत
प्रत्येक मंगल कार्यात लाडू हवाच….
पनीरची भाजी, सोबत पुलाव. वाह, क्या बात है….
कार्यक्रमाची सुरुवात उत्तम सजावटीने….
दर्जेदार सजावट आणि दर्जेदार केटरिंग, कार्यक्रमाचे कौतुक होणारच ना !
काही कार्यक्रमात घेतलेली छायाचित्रे आपण पहिलीत आणि पेजची समाप्ती झाली. ही समाप्ती आपल्याला सेवा पुरविण्याची सुरुवात ठरावी असे मनापासून वाटते. यापुढील पायरी म्हणजे पॅकेज पेज. या पेजवर जाऊन आपण आपले पॅकेज तयार करावे. पॅकेज कसे तयार करावे याची संपूर्ण माहिती आपल्याला त्याच पेजवर मिळेल. आपल्या घरात लवकरच काही मंगलमय वार्ता येवो आणि आपल्या हातून उत्तम अन्नदान घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.