अमच्याबद्दल थोडे

lajjat - Samarth Ramdas desktop banner
lajjat - Samarth Ramdas

नमस्कार,
मी विद्याधर मिराशी. थोडे अमच्याबद्दल या पेजच्या माध्यमातून अपल्याशी संवाद साधत आहे.
आम्ही मुळचे कुवळेभरणी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील, पण गेली ७० वर्षे पुण्यात वास्तव्य. आपणास मी माझ्या व्यवसायाचा अल्पसा परिचय करून देतो. मी करीत असलेला केटरिंग व्यवसाय हा माझ्या आजोबांकडून माझ्या वडिलांना व नंतर मला मिळालेली देणगी.
तसं अमचा व्यवसाय १९८३ साली माझ्या आजोबांनी सुरु केला. त्यावेळी या व्यवसायाचे स्वरूप शक्यतो मजुरी पद्धतीने असायचे. माझे आजोबा, श्री. महादेव मिराशी हे उत्तम स्वयंपाक तर करायचेच, पण त्यासोबत त्यांचा स्वच्छता आणि शिस्तबद्धता यावर भर असायचा. हाच वारसा पुढे माझ्या वडिलांना आणि मला लाभला. आजही माझे वडील वयाच्या ७८ व्या वर्षी या व्यवसायात मला मार्गदर्शन करीत आहेत. माझ्या आजोबांना माझ्या आजीची फार मोलाची मदत मिळाली. याचेच अनुकरण माझ्या आई-वडिलांनी केले आणि आता मी आणि माझी पत्नी करीत आहोत. तसे पाहता अमच्या सर्व कुटुंबाचाच या व्यवसायात मोलाचा सहभाग आहे.
माझ्या वडिलांनी या व्यवसायात येताना श्री.काजेरकर, श्री.डिंगणकर यांजकडे कामाचा अनुभव आणि शिक्षण घेतले. एखादा पदार्थ कसा असावा, त्याची चव आणि रंग कसा असायला हवा याबाबत माझ्या वडिलांनी प्रचंड अभ्यास केला. आजही ते या सर्व बाबी व्यवस्थितच असाव्यात, यासाठी आग्रही असतात.
मी २००१ सालापासून या व्यवसायात आहे. गेली तीस वर्षे आम्ही नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरात सेवा देत आहोत. पर्वती देवस्थान, सारसबाग संस्थान अशा ठिकाणीही आम्हाला सेवा देताना फार आनंद झाला आहे.
पुण्यातील मंगल कार्यालयांतून आउटडोअर केटरिंग सर्व्हिस, लग्न, रिसेप्शन, मुंज, नामकरण सोहोळा, वास्तुशांत आणि डोहाळेजेवण इत्यादी घरगुती कार्यक्रमात सेवा देत आहोत. स्वादिष्ट व दर्जेदार जेवण हीच अमची ओळख बनवण्यात आम्ही कायम प्रयत्नशील आहोत.

चला तर, आमच्या संपर्क पानाच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअ‍ॅप द्वारे ऋणानुबंध विणूयात.

 || शुभं भवतु ||

विद्याधर मिराशी